travelogue

प्रवासाला जाणे हा एक सुंदर अनुभव असतो वास्तविक प्रवास हा माणसाला अधिकाधिक अनुभवसंपन्न बनवायचा छोटासा राजमार्ग आहे असे माझे प्रामाणिक मत आहे आम्हा मुंबईच्या चाकरमा’न्यांना दिवाळी व उन्हाळ्यात येणार्‍या सुट्ट्यांचे बेत आखणे यातली मजा काही औरच असते हे काही वेगळे सांगायलाच नको माझे सासर नांदेड च्या पुढे किनवट येथील आहे तर दिवाळी आम्ही सगळे तिकडेच साजरी करतो नंदिग्राम एक्सप्रेस नांदेड करांना मिळालेले वरदान आहे याच्याशी मुंबईतील सर्व नांदेडवासी सहमत असतील रेल्वेचे रिझर्वेशन तीन महिने आधीपासून हाऊसफुल असते कन्फर्म तिकीट मिळाल्यावर जग जिंकल्याचा आनंद सगळ्यांना होतो तर असे जगज्जेते होऊन प्रवासाच्या तारखेवर डोळा ठेवून सामानाची बांधाबांध करून आम्ही पुढच्या दिवशी प्रवास करायचा आहे, प्रवास करायचा आहे या घोषवाक्याचे गजर करत झोपी गेलो मला स्वतःला कुठे जायचे असेल तर अजिबातच झोप येत नाही माझी ट्रेन चुकली आहे मी नुकतीच प्लॅटफॉर्मवर पोहोचली आहे आणि ट्रेन गेली आहे असे दुःस्वप्न रात्र भर पडत राहतात आणि मी आपली रात्रभर त्या करीना कपूर सारखी “अरे कोई तो ट्रेन रोको ,कोई तो चैन खिचो, ट्रेन च्या मागे वेड्यासारखी धावत राहते. या दहशतीतच सकाळी लवकर जाग ठरलेली मग विषय सुरू होतो डब्याला काय करायचे ?ट्रेनच्या प्रवासात बाहेरचे आपण कितीही सटरफटर खाल्ले तरी प्रॉपर घरचे मस्त जेवण म्हणजे इंद्राच्या दरबाराला लाजवेल असा सोहळा असतो. दोन-तीन प्रकारच्या भाज्या, मस्तपैकी चटण्या, लोणचे, धपाटे खिचडी असा छान देत होतो आणि लक्षात येते डब्यासाठी वेगळी पिशवी बनवावी लागली आहे .नंदिग्राम एक्सप्रेस दादर ला साडेचार वाजता येते आम्ही घरातून वेळेवर पोहोचतो आणि सुरु होतो वाट पाहण्याचा खेळ. नंदिग्राम एक्सप्रेस च्या आधीच एक्स्प्रेस धडधडत जाताना मला दिसते ,आणि मी करीना कपूरच्या स्टाईलने पळणार इतक्यात घरचे सांगतात ही आपली ट्रेन नाही.. माझा आनंद गगनात मावेनासा होतो .प्लॅटफॉर्मवर बसून वाट पाहताना जागोजागी असणारे जाहिरातीचे फलक म्हणजे बेमालूमपणे आपल्या खिशावर केलेले अतिक्रमण असतं.मग सुरु होतो माणसांचे निरीक्षण करण्याचा खेळ काही काही लोकं आपल्या जिवापेक्षा दसपट ओझे सांभाळत त्यांच्या गाडीची वाट पाहत उभे असतात एखादा छोटासा मुलगा प्लॅटफॉर्मवरच्या दुकानातल्या सगळ्या वस्तू आपण खाऊन बघितल्यास पाहिजेत या हट्टाने आपल्या आई-वडिलांच्या मागे ती वस्तू मिळण्यासाठी भुणभुणकरत असतो आणि बाहेर मुलांना कसे ओरडावे यामुळे आतून अतिशय संतप्त झालेलेआणि वरून होईल तेवढा शांत भाव दाखवत बिचारे पालक त्यांची समजूत घालत असतात ते गमतीदार दृश्य बघतच रहावे असे असतं खमंग पॉप कॉन चा वास मुलांच्या नाकात एव्हाना शिरलेला असतो आपल्याकडे पाहून पडत्या फळाची आज्ञा घेऊन मुलांचे पॉपकॉन खाणे सुरू होते तेवढ्यात मुलामुलींचा घोळका येतो कुठल्यातरी पिकनिकला निघालेला त्या सगळ्यांना एकदमच बोलायचे असते त्यांचे शिक्षकही त्यांना ओरडून शांत बसा असे सांगतात थोड्यावेळासाठी ती फुलपाखरे गप्प बसतात शिक्षकांचे लक्ष नाही हे पाहून परत गप्पांना रंग चढतो मुलांच्या .प्लॅटफॉर्मवरच्या रेल्वेच्या छोट्याशा दुकानांमध्ये वेगळ्या रंगाची सरबते अशी मस्त चमकत असतात .या सगळ्या गदारोळात अचानक एक अनाउंसमेंट ऐकू येते “यात्रीगण कृपया ध्यान दीजिए वन वन फोर झिरो वन नंदिग्राम एक्सप्रेस व्हाया नांदेड प्लॅटफॉर्म नंबर चार पर आ रही है !हे ऐकून गर्दीमध्ये अचानक चैतन्य संचारते आपल्या आपल्या डब्या समोर सगळे उभे असतात द्वितीय श्रेणीच्या प्रवासाची सर एसी डब्यातील प्रवासाला कधीच येणार नाही मान्य आहे तिथे खूप सुविधा असते पण मला एसी डबा हा नेहमीच एखाद्या विशिष्ट गर्विष्ठ माणसासारखा वाटत आला आहे. कोणालाही आपल्या जवळ फटकू देत नाही .पण बाकीचे डबे कसे मायाळू असतात .जनरल डब्याची गर्दी आपल्याला सोसवत नाही तिथे अंगात खास वीरश्री असेल तरच जावे !आम्ही आपले द्वितीय श्रेणीच्या डब्या समोर आपल्या नंबर घोकत असतो आणि एकदाची ट्रेन येते” चला, चला ,चला गर्दी करू नका !पुढे व्हा !असे म्हणत आमचे आगमन होते सामान आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य ट्रेनमध्ये व्यवस्थित चढला आहे याची खात्री करून मग शोध सुरू होतो आपल्या सीटचा आपल्या सीटवर नेहमी प्रमाणे आधीच कोणीतरी पसरलेले असते “काका उठता का? आमची सीट आह.”हो, हो बसा ना मला कल्याणलाच उतरायचं आहे असे म्हणतकाका मोठ्या जीवावर येऊन खिडकीजवळची जागा आपल्याला देतात पण थोडे सरकून तिथेच बसतात वरच्या बर्थवर बऱ्याच लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते बहुतेक त्यांना ट्रेनमध्येच छान झोप येत असावी असा विचार करून मी तिकडे दुर्लक्ष करते बाकी सीटवर आरडाओरडा सुरूच असतो ,हो माहिती आहे तुमचे रिझर्वेशन आहे नाही कुठे म्हणतोय… रिझर्वेशन केलं तर असे वागतात जसे काही ट्रेन विकत घेतली आहे !अशा छोट्या छोट्या खटक्या नंतर हळूहळू प्रवासी ट्रेनमध्ये स्थिरस्थावर होतात मला खिडकीची जागा मिळाल्यामुळे माझी अवस्था ‘आज मे उपर आसमा नीचे अशी असते समोरच्या आजी विचारतात माझे मिडल बर्थ आहे तुमचे लोअरआहे ना ?” हो!” मला ना थोडा स्लिप डिस्कचा त्रास आहे मी लोअरबर्थ ला झोपले तर चालेल ना? त्या प्रश्नाला होकारार्थी मान डोलावल्यावर, माणुसकी अजून शिल्लक आहे हे भावा आजीबाईंच्या डोळ्यात तरळून जातात आणि त्या भावांमुळे आपण कोणीतरी विशेष असल्याची जाणीव मनाला कुठेतरी सुखावते रेल्वेत बसल्यानंतर रेल्वेच्या वेगा सारखा आपल्या विचारांनीही वेग धरलेला असतो तेवढ्यात चाय चाय, गरमागरम चाय असे ओरडत चहावाला येतो त्याची ती ओरडण्याची विशिष्ट लकब खास लक्षात ठेवण्यासारखी रेल्वेत चहा अमृततुल्य वगैरे नसतो पण त्याला आपली वेगळी चव आहे चहा न सांडता सराईतपणे पिणे ही एक कला आहे समोरचे दृष्य एकामागून एक मागे पडतात तेव्हा गाडी कल्याण स्टेशन मध्ये शिरते कल्याण ला उतरणारे काका निरोपाचा बाय बाय करून उतरतात आणि अजून ट्रेनमध्ये लोकांची गर्दी असते ती मी पहातच आहे तेवढ्यात खिडकीतून आवाज येतो “ताई पाण्याची बाटली तेवढी माझ्या आईला द्या !एक मुलगा आपल्या आईला प्लॅटफॉर्मवर सोडायला आलेला असतो निरोपाचे बाय-बाय होतात आणि ट्रेन आस्ते आस्ते वेग पकडते .कसारा घाट लागतो “ए कसारा घाटात ऑम्लेट-पाव छान मिळतो हा मागच्या फुलपाखरी मुला-मुलींच्या थव्यातून आवाज येतो,” हो आपण खाऊ या नक्की! भेळवाला येतो ‘भेल भेल चना भेल ‘असे कर्कश ओरडत भेळ ही माझ्या यजमानांचा विक पॉईन्ट अशी भेळ मी बनवायला शिकले तर माझा नवरा मला नक्की राणी हार बनवून देईल अशी मला खात्री आहे असो राणी हाराच्या स्वप्नात गुंतलेले मी त्या खमंग भेेळेवर मस्त ताव मारत, कसली कसली खेळणी विकणारे विक्रेते जरा म्हणून आपला डोळा लागू देत नाहीतआणि अशा कोलाहलात मस्त डुलक्या काढणारे लोक बघून मला त्यांचा खूप हेवा वाटतो .समोरच्या आजीबाई लाडवाचा डबा मुलांकडे सरकवतात मुलं पटकन माझ्याकडे पाहतात अरे खा रे मुलांनो आई काही म्हणणार नाही घरी केलेले आहे मी स्वतः मग माझ्या संमतीची वाट न पाहता मुले लाडू मटकावतात “छान आहे हो आजी लाड! या प्रशंसेने आजीही सुखावते स्टेशनला चढणारी गर्दी लोकांचे एकच म्हणणे असते थोडा सरकता का “रिजर्वेशन चा डब्बा आहे हा” “माहिती आहे आम्हाला वेटिंग आहे आमचे तिकीट असे खरमरीत उत्तर पलीकडून मिळते. बोलघेवडे लोकांचे आत्तापर्यंत गप्पांचे फड रंगलेले असतात नवरोजी,मुलं सगळेच वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सामील झालेली असतात. लाईटस लागतात काहीच काम नसल्यामुळे भूक लागल्या सारखी नेहमीच वाटत राहते “चला घ्यायचे का डबे? हा प्रश्न पाचव्यांदा विचारल्यावर त्याला उत्तर मिळते .मग ट्रेनमध्ये हलत-डुलत खाद्यपदार्थ सांडू न देता प्लेटमध्ये वाढण्याचे मी माझे गृहिणी कौशल्य दाखवते पहा काय कमाल केली या माझ्या मनातल्या गर्वाच्या भावावर त्यात काय एवढे या घरच्यांच्या डोळ्यातील भावामुळे पाणी फिरते.. मनसोक्त जेवत असताना माझा मुलगा कानात कुजबुज करतो आई त्या माणसांनी बघ न्यूज पेपरवरच भाजी ठेवलेली आहे त्यावर जाऊदे रे दोन चार बातम्या त्याच्या पोटात जातील या नवऱ्याच्या उत्तरावर ठसका लागता लागता राहतो . हो, नाही करत करत भाज्यांची देवाण-घेवाण होते त्या वेळेपर्यंत हे औटघटकेचे सहप्रवासी आपले कुटुंबीय बनून जातात .जेवणाचा सोहळा पार पडल्यानंतर आपापले बर्थ टाकून सर्वजण निद्रादेवीच्या आधीन होतात. रात्रभर विक्रेत्यांची वर्दळ ही ट्रेनला जागीच ठेवणारी असते. उजडणारी प्रसन्न सकाळ बघणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो आम्हा मुंबईकरांना आकाश असे तुकड्या-तुकड्यातून ओंजळी एवढे बघायची सवय असते ,आणि सूर्योदय वगैरे रम्य गोष्टी व्हायच्या आधीच बिचारी आपापल्या ऑफिसला पोहोचलेलीे असतात त्यामुळे प्रवासात असताना सूर्योदय मी सहसा कधी चुकवत नाही . अचानक “आई बघ हरीण! हे वाक्य ऐकून आल्यावर लक्षात येतं की अरे इस्लापूर आले सकाळी नांदेड मध्ये ट्रेन पोहोचल्यानंतर प्रसन्न तयार होऊन आलेले प्रवासी पाहून आंघोळ न करताही कसं ताजंतवानं वाटायला लागतं .”चला ,चला स्टेशन जवळ आले आपापले सामान, चपला सगळ्यांची जमवाजमव सुरू होते थंड हवेच्या झुळुका मनाला आधीच सांगत असतात गाव जवळ येतय ,गाव जवळ येण्याचा येण्याचा आनंदही असतो आणि प्रवास संपण्याची हूरहूरही असते एकदाचे किनवट हे नाव प्लॅटफॉर्मवरच्या पाटीवर दिसते “आले आपले स्टेशन सहप्रवाशांना निरोप घेऊन आम्ही उतरतो त,”नंदिग्राम एक्सप्रेस वाया नांदेड प्लॅटफॉर्मपर आ रही है! हे वाक्य परत लवकर ऐकण्याच्या आशेवरच..धन्यवाद। कल्पना उबाळे

Kalpana Ubale
Author: Kalpana Ubale

Kalpana

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]
Share Post

1 Comment

  1. Kalpana madam…Kay solid pravas varnan lihile tumhi.ase vatle ki mich pravas karte aahe….mastt…keep it up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *