‘ I LOVE U MUMMA ‘ …… Nowadays every child easily says these wordds to their Mother…..

पण आपल्यावेळी असे होते का काही ? .. आज आपण कितीतरी वेळ आपल्या मुलांसोबत घालवतो … त्यांच्या सगळ्या आवडी निवडी जपतो . पण आपल्या आई ला तेव्हा वेळ होता का या साऱ्या गोष्टीसाठी ? भल्या मोठ्या कुटुंबात सगळ्यांचं करता करता तिला धड आप्याकडे बघायला नीट वेळ हि नव्हता… आणि आपण तरी किती सभ्य होतो . आपण तरी कितीसा वेळ तिला देत होतो? अंगात घे मानून मस्ती.. सतत खेळ.. तिच्यासाठी वेळ काढायला तशी अक्कलच नव्हती आपल्यात..

काळ बदलला तशी माणसे बदलली.. माणसातली वृत्ती बदलली .. मोठ्या कुटुंबाला सांभाळता सांभाळता  तिने नकळतपणे आपल्यात जे  संस्कार रुजवले त्याच मात्र आता खूप कौतुक करावेसे वाटते.. तिच्या त्या संस्कारासाठी , तिच्या त्या बलिदानाची [ कुटुंबासाठीच्या  ] आज खऱ्या अर्थाने हा MOTHERS DAY साजरा करावासा वाटतोय .. तिने जे संस्कार आपल्यात  रुजवले ते संस्कार आजच्या पिढीमध्ये रुजवणे  खरंच खूप कठीण .. आजची पिढी खूपच स्मार्ट .. त्यांना ते संस्कार झेपतेही नसावेत.. आज ची पिढी आपल्यावरच चिडत असते. आणि मग आपणच त्यांच्या मागे जाऊन त्यांची समजूत काढत बसावे लागते..

तुम्ही तुमच्या लहानपणी तुमच्या आई वर कितीसे असे चिडलात ? आठवतंय का ? कारण  मुळात आपण तिच्यासाठी तेवढा वेळ हि देत नसू . आपण फक्त खाणे पिणे झोपणे .. बस्स…..तिने  तिचे मन कधी कुणाकडे व्यक्त केले का ? नवरा सतत कामासाठी बाहेरगावी ..आणि ती मात्र तिचे कुटुंब संभाळण्यात व्यस्त.. त्यातच ती आपाल्याला घडवण्यात व्यस्त.. भले तिला काही कळत नसेल पण अभ्यास करताना मात्र ती आपल्या सोबत बसे .. म्हणूनच सलाम तिच्या त्या कर्तुत्वाला .. तिचे आयुष्य तिने सदैव तिच्या कुटुंबासाठी वेचले. तिच्या त्या बलिदानाला सलाम ..  आज सर्रास आपण आपले कुटुंब घेऊन फिरतो पण त्या काली आपल्या आई ला कितीसे फिरायला मिळाले .. कधी अगदीच अली वेळ तर तीच मात्र ठरलेले कि मी घर सांभाळते तुम्ही या जाऊन .. तिच्यातल्या या समर्पणाला सलाम.. मग हा आजचा दिवस पहिला त्या मातेला आपण समर्पित करूया..

त्या काळच्या  आयांना आज आपण किती सुखात ठेवतो यावर या आजच्या दिवसाचे महत्त्व टिकून आहे असे मला वाटते .. कारण त्यांनी जे कष्ट झेलले त्याची परतफेड हि आजच्या पिढीने करायला हवी.. त्यांना वेळ देऊन ,त्यांचे  लाड पुरवून,त्यांच्या इच्छा पूर्ण करून ..  आणि खर सांगू का आज आपण आपल्या मुलांच्या माध्यमातून तिचे अस्तित्व ओळखायला हवे .. तसा  तिला मान द्यायला हवा.. तिच्या चेहऱ्यावरच हास्य हीच तुमची खरी संपत्ती असायला हवी.. हे जेव्हा होईल त्याच तोच दिवस हा खऱ्या अर्थाने मातृदिन असेल यात शंकाच नाही … अश्या त्या सगळ्या मातांना आजच्या दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..

जात जात तिच्यासाठी या दोन ओळी … 

आई म्हणजे आई असते
तुझी माझी असे काहीच नसते
दुसऱ्याच्या आईतहि ज्याला आई दिसते
त्यानेच तिचे महत्व जाणले असते …

 

पोट  भरले त री घास ती भरवत असते
आपल्याला चिंतेत बघून तिचे काळीज तळमळते
आजारी झाल्यावर स्वतः डॉक्टर होऊन जाते
ती आई हि आई नसून ईश्वराचे एक रूप असते ….

आपली आवड निवड तिला तोंडपाठ असते
कितीही मोठे झालो तरी ती आपल्यातच गुंतलेली असते
निस्वार्थ प्रेम आणि माया तीच खरी शिकवते
आई म्हणजे खर्च फक्त आई असते
ती तुही अन माझी असे काही नसते ….

आपल्या आई चा आदर करा .. तिला सन्मान द्या.. तिच्या बलिदानाचे सार्थक करा .. एका दिवसासाठी तिचा आदर न करता रोज तिच्यासाठी हा दिवस साजरा करा .. जिथवर तिचे आयुष्य तिथवर तिला सुखात ठेवा..

धन्यवाद….

Sheetal Palyekar
Author: Sheetal Palyekar

Hello friends, Sheetal here, I write short articles and poems. Hope you like them 🙂

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *