देवा तुझ्या गाभार्याचा बघ
उंबरठा झाला सुना सुना
तरी कशी तुला आता
दया आमची येईना ?

कळतंय मला आमच्यासारखाच
तू हि आहेस बंदिस्त
सेवा करताना बघ बिचारे
पुलिस नर्स डॉक्टर झाले कसे त्रस्त

दया थोडी त्यांची तरी देवा
करशील ना रे आता
दिवसरात्र सेवेत आमच्या झटतात
त्यांच्याहि पोटापाण्याकरता

माहीतच आहे तुला देवा
अखख जग शांत झालय
नावापुरतेच जिवंत सगळे आता
मरण मात्र जरा लांबलय

वाऱ्यासारखी पळणारी माणसे
आज घरात कोंडून बसलीत
तुझंही घर शांतच कि रे
बघ जरा , तुझ्या पायाकडची फुल सुकलीत

आधीच गेली होती माणसे
दूर एकेमेकांपासून मानाने
तू त्यात भर टाकलीस
केलस त्यांना आणखी दूर शरीराने

हाय हॅलो करणारा माणूस
हलकेच मिठी मारत होता
मिठी त्यांची हिरावून घेतलीस
काय त्याचा गुन्हा होता

कळतंय मला आम्ही सुद्धा
या सृष्टीची खूप हानी केली
पाया पडतो तुझ्या आता
आम्हाला आमची चूक कळाली

विसरलो होतो जातपात
एक धर्म होतो विसरलो
दूर गेलो होतो शरीराने
पण खरंच आता घट्ट जवळ आलो

आधीच काय कमी ताप होता
गृहिणींच्या त्या डोक्याला
रांधणं आल, उष्टी आली
डबल ड्युटी तिच्या वाट्याला

सर्वाना बसवलंस घरी पण
केलीस का थोडी दया तिची
काहीही झालं कि बळी तिचा ठरलेला
का दरवेळी परीक्षा तिची

लहानगी पिल्लं बिचारी
सुट्टीचा आनंद घेणार होती
उंबरठा ओलांडायला सुद्धा आता
आई त्यांना घालतेय भीती

तुझेच रूप असते या चराचरात
कळून चुकलंय आता आम्हाला
जीव देतोय आता एक्मेकांसांठी
कळायला थोडा उशीरच झाला

शांत तू तिथे गाभाऱ्यात खरा
तरी तुझे कर्तव्य विसरला नाहीस
वाचन तुझे पाळलेस निष्ठेने
उपाशी कुणी मरणार नाही

बघवत नाही आता आम्हाला
नासाडी हि तुझ्या माझ्याच सृष्टीची
करू भरभराट पुन्हा नव्याने
घेतो शपथ तुझ्या नावाची

कळ सोसली आम्ही , तुही खूप सोसली
माणुसकी असते श्रेष्ठ हि चूक उमजली
खूप कष्ट करू आता तू हि थोडी मदत कर
जमलंच तर एकदा या तुझ्या पामराला माफ कर
या तुझ्या पामराला माफ कर ……

Sheetal Palyekar
Author: Sheetal Palyekar

Hello friends, Sheetal here, I write short articles and poems. Hope you like them 🙂

Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]
Share Post

2 Comments

  1. अप्रतिम कविता शीतल ताई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *