आयुष्यात खूप आहे शिकायला, शिकून फक्त घ्यावे
आयुष्य हे जगत असताना, लहान फक्त समजावे ॥
कधी जरी चुकले पाऊल, हतबल होऊ नये
अनुभवाची ही पायरी चढून, पुढे पुढे चालावे
आयुष्यात खूप आहे शिकायला शिकून फक्त घ्यावे ॥
कधी जुळतात नातीगोती
नात्यांच्या वा मैत्रीच्या,
ऋणानुबंधाच्या या गाठी,
रक्ताच्या वा मनाच्या
आयुष्यात खूप आहे शिकायला शिकून फक्त घ्यावे ॥
शिकून झालो मोठे जरी, कीर्ती रुपी मोठे व्हावे
वागुनी नम्रतेने सर्वांशी , संस्कृती जपावे
जन्म पित्याने ( देवाने ) जन्म दिला, भेदभाव न करता,
बुद्धीची संपत्ती वापरून, काय माणुसकी तुम्ही जपता?
आयुष्यात खूप आहे शिकायला, शिकून फक्त घ्यावे ॥
होऊन गेला राजा शिवाजी, जो दुसऱ्यांसाठी जगला
ठेवून त्याचा आदर्श समोर, काय इतरांना तुम्ही देता?
स्वार्थाच्या या प्रवाहामध्ये वाहून जाऊ नका,
परोपकाराची कास धरुनी , माणुसकी तेवढी जपा,
आयुष्यात खूप आहे शिकायला, शिकून फक्त घ्यावे आयुष्य हे जगत असताना ॥
लहान फक्त समजावे ॥

  • शुभ्रा ठाकूर
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
Swayam Siddha
Author: Swayam Siddha

Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *