स्वातंत्र्य... स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला,
विरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या,
शुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी,
स्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या.
असतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना,
स्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा.
कोणीतरी तीचीही बाजू पडताळावी,
कपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा.
बातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय,
स्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.
- खुशाली

Khushali Rame
Author: Khushali Rame

Working

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]
Share Post

1 Comment

  1. अप्रतिम आणि वास्तववादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *