परस्परावलंबन हे यशस्वी व्यवस्थापन कौशल्याचा अंतर्भुत हिस्सा आहे. एक ठराविक काम ठराविक दर्जा राखून, ठराविक वेळात पूर्ण करणे हे यशाचे गमक आहे. बरीचशी काम एकएकटयाने होण्यापेक्षा गटांनी (team) केली जातात. जिथे परस्परावलंबन अपरिहार्य आहे. आजच्या अधिकाधिक वैश्विक युगात (Global Age) व अधिक गुंतागुंतीच्या कामाच्या स्वरुपाने अशा परस्परावलंबनाची प्रक्रिया अधिकच गडद केली आहे. यामुळे व्यवस्थापनाची प्रत्येक level ने आपल्या वरच्या level ला जबाबदार असते.काम योग्य त-हेने होण्यासाठी, माणसाची क्षमता, दर्जा, कामाची समज, कौशल्य व तालिम तर जरुरी असेलच पण याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे.