अशी शाळा तुझ्यासाठी माझ्या बाळा, घडवेन मी अशी शाळा , नसेल फक्त निर्जिव फळा असेल वात्सल्य अन् लळा , नसेल तुझ्या तोंडावर बोट , अन् हाताची घडी , खुर्ची पालक शिक्षक अन् टेबलावर छडी , असतील तूच बनवलेली , उदाहरणे अन् समीकरणे , अन् वापरासाठी भुकेली , नाना परीची उपकरणेपूर्ण वाचा …

घरटे

भल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची चिवचिव कानी पडली !! हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली !! किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला !! माणसांचा शेजार हवाय कशाला ? रोज रोजपूर्ण वाचा …

स्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला, विरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या, शुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी, स्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या. असतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना, स्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा. कोणीतरी तीचीही बाजू पडताळावी, कपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा. बातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय, स्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.पूर्ण वाचा …

life

जीवनाच्या या धावपळीत जीवन जगणे राहून गेले सिमेंटच्या या जंगलात हिरवळीवर धावणे राहून गेले मंद हळूवार वाऱ्यावरती पानांचे ते हलणे लाजत मुरडत आधाराने वेलीचे ते चढणे सुवासिक गुलाब केसात तो माळणे मातीच्या ओल्या स्पर्शाने अंगी रोमांच येणे आयुष्याच्या सारीपाटावर हे सर्व राहून गेले पण चला, आपण करू पुन्हा श्रीगणेशा देऊपूर्ण वाचा …

देवा तुझ्या गाभार्याचा बघ उंबरठा झाला सुना सुना तरी कशी तुला आता दया आमची येईना ? कळतंय मला आमच्यासारखाच तू हि आहेस बंदिस्त सेवा करताना बघ बिचारे पुलिस नर्स डॉक्टर झाले कसे त्रस्त दया थोडी त्यांची तरी देवा करशील ना रे आता दिवसरात्र सेवेत आमच्या झटतात त्यांच्याहि पोटापाण्याकरता माहीतच आहेपूर्ण वाचा …

आयुष्यात खूप आहे शिकायला, शिकून फक्त घ्यावे आयुष्य हे जगत असताना, लहान फक्त समजावे ॥ कधी जरी चुकले पाऊल, हतबल होऊ नये अनुभवाची ही पायरी चढून, पुढे पुढे चालावे आयुष्यात खूप आहे शिकायला शिकून फक्त घ्यावे ॥ कधी जुळतात नातीगोती नात्यांच्या वा मैत्रीच्या, ऋणानुबंधाच्या या गाठी, रक्ताच्या वा मनाच्या आयुष्यातपूर्ण वाचा …

नऊवारी नेसून, मुंडावळ्या बांधून लाडकी लेक माझी नवरी झाली. गोऱ्या हातात चुडा तो सुंदर, हाती रेखीली मेहंदी नक्षीदार. जोडवी चांदीची झळकती पायात, रुणझुणती पैंजणे गोड नाद स्वरात. आईच्या मायेचा घेऊन पदर, जाशील मुली तू पतीच्या घरात. संस्काराची ओंजळ भरूनी देते तुजला, ठेव तू स्मरणात तुझ्या माहेरच्या प्रेमाला. नाजूक नथ तीपूर्ण वाचा …