अशी शाळा तुझ्यासाठी माझ्या बाळा, घडवेन मी अशी शाळा , नसेल फक्त निर्जिव फळा असेल वात्सल्य अन् लळा , नसेल तुझ्या तोंडावर बोट , अन् हाताची घडी , खुर्ची पालक शिक्षक अन् टेबलावर छडी , असतील तूच बनवलेली , उदाहरणे अन् समीकरणे , अन् वापरासाठी भुकेली , नाना परीची उपकरणेपूर्ण वाचा …

घरटे

भल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची चिवचिव कानी पडली !! हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली !! किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला !! माणसांचा शेजार हवाय कशाला ? रोज रोजपूर्ण वाचा …

गजानना श्री गणरायाआधी वंदू तुज मोरया!!        सण उत्सवांचा श्रावण सरला की वेध लागतात ते गणेश आगमनाचे. आम्हा कोकणवासियांमध्ये गणेशोत्सव म्हटला कि आनंदाला उधाण येते. प्रत्येक घराला रंग रंगोटी चा साज चढतो. नवे पडदे, तोरणे, झुंबरे या सर्वांनी घर नटते. अंगण शेणाच्या सारवणाच्या रंगात न्हाते. हिरव्यागार सारवणावर रंगीबेरंगी रांगोळीची दाटीपूर्ण वाचा …

स्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला, विरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या, शुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी, स्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या. असतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना, स्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा. कोणीतरी तीचीही बाजू पडताळावी, कपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा. बातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय, स्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.पूर्ण वाचा …

” कन्या वाचवा समाज जगवा”!! कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरूपूर्ण वाचा …

bappa maza online

बाप्पा माझा ऑनलाइन मध्ये प्राप्त झालेले निवडक फोटो स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, तुम्हाला तुमच्या घरच्या बाप्पांना इंटरनेट जगतावर आरूढ होण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आगामी गणेशोत्सवात संस्था तुमच्या साठी विविध उपक्रम राबबित आहे, ते खालील प्रमाणे. माझा बाप्पा आपल्या बाप्पांचा फोटो आम्हाला खाली दिलेला फोर्म भरून पाठवाआम्ही तुमच्या बाप्पांचा फोटोपूर्ण वाचा …

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील निबंध  स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, द्वारे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत संपूर्ण राज्यातून निबंध प्राप्त झाले असून त्यामधून संस्थेच्या स्वयंप्रेरितच्या संपादकीय मंडळ तसेच परीक्षक मंडळाकडून निवड करून विजेत्यांच्या नावांची घोषणा खालील प्रमाणे करण्यात येत आहे. सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा !! पहिल्या ३ विजेत्यांना ९८३३३६४९३० /पूर्ण वाचा …

तू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय झालीये. काही स्त्रियाही भूषण मानतात. अन्याय होत असला तरी सहन करतात. पण सख्यांनो हे पूर्णतः खरे नव्हते, नाही आणि नसणार आहे. स्त्री शांत रुपात दुर्गापूर्ण वाचा …

travelogue

प्रवासाला जाणे हा एक सुंदर अनुभव असतो वास्तविक प्रवास हा माणसाला अधिकाधिक अनुभवसंपन्न बनवायचा छोटासा राजमार्ग आहे असे माझे प्रामाणिक मत आहे आम्हा मुंबईच्या चाकरमा’न्यांना दिवाळी व उन्हाळ्यात येणार्‍या सुट्ट्यांचे बेत आखणे यातली मजा काही औरच असते हे काही वेगळे सांगायलाच नको माझे सासर नांदेड च्या पुढे किनवट येथील आहेपूर्ण वाचा …