नऊवारी नेसून, मुंडावळ्या बांधून लाडकी लेक माझी नवरी झाली. गोऱ्या हातात चुडा तो सुंदर, हाती रेखीली मेहंदी नक्षीदार. जोडवी चांदीची झळकती पायात, रुणझुणती पैंजणे गोड नाद स्वरात. आईच्या मायेचा घेऊन पदर, जाशील मुली तू पतीच्या घरात. संस्काराची ओंजळ भरूनी देते तुजला, ठेव तू स्मरणात तुझ्या माहेरच्या प्रेमाला. नाजूक नथ ती हालते लाडात, ओठांवरती हळूच नाव घेता उखाण्यात. गळ्यामध्ये साजे सौभाग्याचे लेणे, दोन्ही घरांचे आता तुझ्याजवळी येणे. हात हाती घेऊनी चाला संसाररूपी जीवनी, पाठी सदैव तुमच्या असेल ईश्वराची छत्री. साधना अणवेकर
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
Swayam Siddha
Author: Swayam Siddha

Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *