peplum top

आपल्या वॉडरोबमध्ये असणारे कपडे आणि सतत बदलणारी फॅशन याचा ताळमेळ राखणे थोडे अवघडच असते. ऑफिस, कॉलेज, आउटिंग, पार्टी, मीटिंग आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगळी स्टाईल, कपडे असणे आवश्यक असते, कारण आपण पार्टीवेअर ऑफिसमध्ये घालू शकत नाही. मात्र, भल्या मोठ्या फॅशनच्या दुनियेतील काही कपड्यांचे प्रकार असे आहेत, जे अनेक ठिकाणी वापरता येऊ शकतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘पेप्लम टॉप’ होय.

फॅशनचा प्रारंभ 
पेप्लम हे प्रथम १९३० आणि १९४०मध्ये लोकप्रिय झाले. स्कर्टवर साजेसा शॉर्ट, जॅकेटसारखा आणि कमरेचा भाग दाखविणारा असा हा टॉप तयार केला गेला. काही वर्षांनी त्याचा वापर कमी होऊन तो जवळपास नाहीसा झाला. पुढे १९८०च्या दशकात आणि नंतर २०१२-२०१३च्या दरम्यान तो पुन्हा झळकू लागला. गेल्या दोन वर्षांत पेप्लम टॉपची फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आली आहे.

पेप्लम टॉप म्हणजे काय?

  • ब्लाऊज, जॅकेट किंवा टॉपच्या कमरेशी जोडलेला एक छोटा भाग म्हणजे पेप्लम. अनारकली ड्रेसच्या कमरेला असणाऱ्या घेराप्रमाणे या टॉपचे स्वरूप असते. खरेतर या प्रकारचे टॉप तुम्ही अनेकदा पाहिले असतील. सध्या याची खूप चलती आहे.
  • हा पॅटर्न इतर टॉप्सप्रमाणे साधारण नसल्याने सर्वांपेक्षा नक्कीच वेगळा लुक देतो.
  • या टॉपसह तुम्हाला एक क्लासिक लुक मिळेल. त्यामुळे अधिक फॅशन करण्याची गरज नाही. पेप्लमसह हायवेस्ट जीन्स परिधान करा आणि  नेहमीपेक्षा वेगळा लुक मिळेल.
  • इतिहास पाहता पेप्लम हे स्कर्टसाठी बनवले गेले असले, तरी आता त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. ते फक्त स्कर्टसाठी मर्यादित राहिले नसून, जीन्स, पॅन्ट आणि कोऑर्डिनेटसाठी पेप्लम टॉपची फॅशन आली आहे.
  • पेप्लम टॉपमध्ये अनेक पॅटर्न येतात. मात्र, त्यामधील पूर्ण हातांच्या टॉपला सर्वाधिक मागणी पाहायला मिळते.
  • हा टॉप तुम्ही ऑफिस, कॉलेज, पार्टी आणि अशा इतर अनेक ठिकाणी घालू शकता.
  • पारंपरिक स्टाईल आणि डिझाईनमध्ये कुर्तीदेखील ट्रेडिंगमध्ये आहे. एवढेच नव्हे, तर आता वेडींग कलेक्शनमध्येही भरजरी पेप्लम डिझायनरी टॉप पाहायला मिळतात.
  • धोती, प्लाझो आणि शरारावरही हे टॉप वेगळा लुक देतात.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
swayamprerit
Author: swayamprerit

A platform for marathi women

Share Post